Home

Welcome to My New Blogging Blog

स्वामी विवेकानंद 12 जानेवारी 1863 – 4 जुलै 1902 विवेकानंदांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त . ते श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते . रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले . जगभरात रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत . कलकत्यातील सिमलापल्ली येथे 12 जानेवारी 1863 रोजी विवेकानंदांचा जन्म झाला . हा दिवस मकर संक्रांतीचा होता . वडिल विश्वनाथ दत्त हे कलकत्ता उच्च न्यायालयात वकील होते . आई भुवनेश्वरी धार्मिक वृत्तीच्या होत्या . वेद, उपनिषदे , रामायण , महाभारत तसेच इतिहास , समाजशास्त्र , कला , साहित्य इत्यादी विषयात नरैंद्रनाथांना रुची आणि गती होती . शास्त्रीय संगीताचीही त्यांना जाण होती . बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून त्यांनी गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले होते . मित्र परिवार त्यांना बिले या नावानी हाक मारत . शिक्षणाची सुरूवात त्यांनी घरीच केली . 1871 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेतला . तेथे त्यांनी तर्कशास्त्र , पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि युरोपचा इतिहास याचा अभ्यास केला . 1884 मध्ये बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले . नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम , इमॕन्लयुल कांट , गोत्तिलेब फित्शे , बारुच स्पिनोझा , जॉर्ज हेगेल , आर्थर शोपेनहायर , अॉगस्ट कोम्ट , हर्बर्ट स्पेन्सर , जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता . स्पेन्सरच्या Education या पुस्तकाचा अनुवादही केला होता . पाश्चात्य तत्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता . स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ विल्यम हसी त्यांच्या बद्दल लिहितात ” नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे , मी खूप फिरलो , जग पाहिले परंतु त्याच्या सारखी प्रतिभा आणि बुद्धी सामर्थ्य असलेला मुलगा मला अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही.” त्यांना श्रुतिधारा म्हटले जात असे . राजा अजित सिंग खेत्री यांनी दि 10 मे 1893 या दिवशी स्वामीजींना विवेकानंद असे नाव दिले . 11 सप्टेंबर 1893 साली अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्व धर्मीय परिषद भरली होती , ” अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींना ” अशी त्यांनी भाषणास सुरूवात केली आणि सात सहस्त्र जमावाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता . जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो . या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले . जगातील सर्व धर्मांचे सारतत्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले . अमेरिकेतील वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन भारतातून आलेला एक वादळी व्यक्तीमत्वाचा संन्यासी असे केले . न्यूयॉर्क क्रिटिकने त्यांच्या बद्दल लिहिले आहे की ” ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत ” अमेरिका आणि इंग्लंड मध्ये त्यांनी वेदांत सोसायटी स्थापली . विष काय आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला तेंव्हा त्यांनी खूप छान उत्तर दिले . जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ते विष बनते ……. मग ती ताकद असो , गर्व असो, पैसा असो, भूक असो …. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे केलेल्या भाषणास 11 सप्टेंबर 2019 रोजी 126 वर्षे पूर्ण झाली . स्वामीजी हिंदू तत्वज्ञानाच्या वेदांत शाखेचे पुरस्कर्ते होते . आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले . * त्यांच्या मते सर्व प्राणीमात्र शिवाचे अंश आहेत , त्यामुळेच शिवभावे जीवसेवा हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले * प्रत्येक जीव हा मूळ स्वरुपात ईश्वरी /दैवी आहे . * अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे . * कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान या पैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करुन मुक्ती मिळवली पाहिजे . * उठा जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होई पर्यंत थांबू नका . शुक्रवार 4 जुलै 1902 या दिवशी त्यांनी कलकत्या जवळील बेलूर मठात समाधी घेतली . रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षांपर्यंत आपण जगू ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली . कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे . 12 जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिवस भारतात युवक दिन म्हणून पाळला जातो मुकुंद कुलकर्णी

My First Blog Post

Be yourself; Everyone else is already taken. — Oscar Wilde. This is the first post on my new blog. I’m just getting this new blog going, so stay tuned for more. Subscribe below to get notified when I post new updates.


Follow My Blog

Get new content delivered directly to your inbox.

Create your website with WordPress.com
Get started